जिल्'ातील सहकारी बॅँकांचा पहिल्यांदाच दहा हजार कोटींवर व्यवसाय-: दहा बॅँकांचा एनपीए शून्य टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 09:58 PM2019-05-28T21:58:14+5:302019-05-28T22:00:56+5:30
जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे
अविनाश बाड
आटपाडी : जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. जिल्'ातील सहकारी बॅँका सशक्त होत असल्याने आर्थिक विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
गरजूंना तातडीने कर्जपुरवठा करून त्यांना सक्षम बनविण्यात जिल्'ातील सहकारी बॅँकांचा वाटा मोठा आहे. जिल्'ात सहकारी बॅँकांचे जाळेही मोठे आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेशिवाय सहकारी बॅँकांच्या २५९ शाखा आहेत. त्यांची सभासद संख्या २५ लाख ५४ हजार ४९९ आहे. गेल्या आर्थिक वर्षात या बॅँकांनी ४ हजार १७५ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे.
विशेष म्हणजे कर्जाची वसुली खूप चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा शून्य टक्के एनपीए असलेल्या बॅँकांच्या संख्येत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. सर्व सहकारी बॅँकांचा सरासरी नेट एनपीए फक्त २.२४ टक्के, तर ग्रॉस एनपीए ५.९४ टक्के एवढा आहे. सरकारी बॅँकांचा सरासरी ग्रॉस एनपीए १५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सरकारी बॅँकांच्या तुलनेत जिल्'ातील सहकारी बॅँकांची कामगिरी अतिशय चांगली ठरली आहे. एनपीए कमी झाल्याने बॅँकांचा नफा वाढला आहे. त्यामुळे बॅँकांचा स्वनिधी वाढला. त्यामुळे सभासदांच्या लाभांशामध्ये वाढ होणार आहे.
शून्य टक्के एनपीएच्या विक्रमी बॅँका
राजारामबापू बॅँक, हुतात्मा बॅँक, पलूस बॅँक, दि आष्टा पीपल्स बॅँक, दि बाबासाहेब देशमुख बॅँक, मानसिंग को-आॅप. बॅँक, तासगाव अर्बन बॅँक, आप्पासाहेब बिरनाळे बॅँक, श्री लक्ष्मी महिला बॅँक आणि श्री लक्ष्मी म्हैसाळ बॅँक या बॅँकांनी यंदा शून्य टक्के एनपीएचा विक्रम केला आहे.
जिल्'ातील बॅँकांची गरुडझेप
जिल्'ातील सहकारी बॅँकांनी ९६ कोटी ३७ लाख एवढा ढोबळ नफा मिळविला आहे, तर २८ कोटी ६९ लाख एवढा आगाऊ आयकर भरला आहे. ४० कोटी ४७ लाख निव्वळ नफा कमावला आहे. १९५८ कोटी २० लाखांची गुंतवणूक केली आहे. बॅँकांकडे ४६७ कोटी ८४ लाखांचा स्वनिधी असून, ठेवींमध्ये वाढ होऊन ६ हजार ६२ कोटी ८४ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. सर्व बॅँकांमध्ये आॅनलाईन सीबीएस प्रणाली कार्यरत आहे. आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम सुविधा उपलब्ध आहेत.
जिल्'ातील सहकारी बॅँका आता सक्षम झाल्या आहेत. सहकारी बॅँकांवर लोकांचा विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेला ५ टक्केच्या आत नेट एनपीए अपेक्षित आहे. त्यापेक्षा शून्य यक्के नेट एनपीए करून खूप चांगल्या पद्धतीने बॅँका काम करीत आहेत. रिझर्व्ह बॅँकेने आता नवीन शाखांना मंजुरी द्यायला पाहिजे. शासकीय अनुदानाची खाती सहकारी बॅँकांमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात द्यावी.
- भगवंत आडमुठे, मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्'ातील सहकारी बॅँकांसमोर अनेक आव्हाने असताना बॅँकांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही विक्रमी वसुली झाली आहे. ज्यांची कुठे पत नाही, त्यांची पत निर्माण करून ताठ मानेने समाजासमोर त्यांना उभा करणाऱ्या सहकारी बॅँका जिल्'ाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतील. २० पैकी १८ बॅँकांना ‘अ’आॅडिट वर्ग आहे.
- यु. टी. जाधव, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँक