जिल्हाधिकारी पहिल्याच दिवशी ‘अॅक्शन मोड’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:39 PM2019-02-22T23:39:00+5:302019-02-22T23:40:33+5:30
नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह
सांगली : नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अधिकाºयांनी केलेल्या स्वागतानंतर कामास प्राधान्य देऊ म्हणत त्यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना भेटी देत माहिती घेतली. त्यामुळे पहिल्यादिवशीच जिल्हाधिकारी ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे अधिकारी, कर्मचाºयांना दिसून आले.
बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर रात्रीच उशिरा त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून सूत्रे स्वीकारली होती. गुरुवारी सकाळी ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. याची उत्सुकता कर्मचारी व अधिकाºयांच्या चेहºयावर दिसून येत होती. त्यांचे आगमन होताच सर्वप्रथम महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख आदींनी जिल्हाधिकाºयांचे स्वागत केले. कर्मचारी संघटना, तलाठी संघटनेच्या पदाधिकाºयांसह सर्वच कर्मचाºयांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यांनी अधिकाºयांशी संवाद साधत सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, कामात अडचण असेल तर प्रत्यक्ष सांगा; पण कामात दिरंगाई नको, असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांशीही संवाद साधला.
या भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना भेटी देत माहिती घेतली. विभागाचे प्रमुख, कर्मचारी व कामकाजाची माहिती घेतली. त्याचवेळी उपस्थित सर्वसामान्य जनतेचीही त्यांनी भेट घेतली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कक्षाला भेट देत त्यांनी निधी संकलनाची माहिती घेतली. प्रशासनातर्फे प्रभावीपणे सुरू असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीबाबतही आढावा घेत त्यांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली.
शहीद जवानांना जिल्हाधिकाºयांची मदत
नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना भेटी देताना शहीद जवान मदत कक्षालाही भेट दिली. यावेळी मल्लेवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी दिलेल्या १० हजार १०० रुपयांची मदत त्यांनी स्वीकारली. शिवाय या मदत कक्षाकडे स्वत:ही आर्थिक मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जपली.