शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी चौधरी यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:19 PM2021-07-28T18:19:00+5:302021-07-28T18:21:51+5:30
Sangli Flood Collcator : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा तालुक्यातील पूरबाधित गांवाना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुक
सांगली: अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा तालुक्यातील पूरबाधित गांवाना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुकसान याची पाहणी करुन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना तालूका प्रशासनाला दिल्या.
पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थीतीत तालुका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुर्णत: बाधित झालेले देववाडी तसेच अंशत: बाधित कांदे, सागाव, मांगले व मोराणा नदी काठच्या भागाला भेटी दिल्या
मोराणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर प्रवाह बाहेर गेल्यामुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. पूरग्रस्त गावांना भेटी देत असताना व पाहणी करत असताना त्यांनी आरोग्य, स्वच्छता व स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठ्या संदर्भातही दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
कांदे येथे स्थलांतरीतांना अन्यधान्यांचे वाटप
महापूरामूळे अनेकांचे संसार उद्वस्त झाले असून अशा बाधित झालेल्या कुटुंबाना शासनाने तात्काळ स्वरुपात 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 किलो तूर मोफत देण्याचे जाहीर केले आहे. यानूसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कांदे येथे धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये 47 कुटुंबांना 470 किलो गहू, 470 तांदूळ वाटप केले. तूरडाळ उपलब्ध होताच तिचेही वाटप त्वरित करण्यात येणार आहे.
यावेळी, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, पोलीस निरिक्षक श्री चिल्लावार, तालुका आरोग्य अधिकारी प्रविण पाटील, संबधित गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.