मांगले येथे ´पूरस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:44+5:302021-07-28T04:28:44+5:30
मांगले : वारणा आणि मोरणा या दोन नद्यांना आलेल्या महापुराने मांगले (ता. शिराळा) येथे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. अभिजित ...
मांगले : वारणा आणि मोरणा या दोन नद्यांना आलेल्या महापुराने मांगले (ता. शिराळा) येथे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी पाहणी केली. पूरग्रस्त व नुकसान झालेले एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहता कामा नये यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मांगले येथील ११६६ पूरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे केले आहेत. अद्याप नदीपलीकडील रहिवाशांचे पंचनामे करण्याचे राहिले आहेत. तसेच १६ घरे पुराच्या पाण्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यांची पाहणी जिल्हाधिकारी चौधरी यांनी केली. चरापले गल्लीतील पूरग्रस्त घरांची त्यांनी पाहणी केली. पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी सरपंच राहुल पवार, उत्तम गावडे, उपसरपंच धनाजी नरुटे व संतोष उत्तरकर यांनी गावातील समस्या मांडल्या. गावाची पाणीपुरवठा योजना अद्याप पुराच्या पाण्यात आहे. शिवाय विद्युत खांब पडल्याने किमान आठवडाभर पाणीपुरवठा होणार नाही. याबाबत उपाययोजना करण्यासाठी चाैदाव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्याची त्यांनी मागणी केली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, सरपंच सौमिना बेंद्रे, माजी सरपंच राहुल पवार, विजय पाटील, पोपट चरापले, विजयकुमार पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
270721\20210727_142731.jpg
मांगले जिल्हाधिकारी भेट