ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का? सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं साधेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 06:31 PM2023-10-17T18:31:05+5:302023-10-17T18:31:12+5:30
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी निवडणूक पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबई येथे बैठकीसाठी आले होते.
विकास शहा
शिराळा : ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का... आणि मागचापुढचा विचार न करता मदत करण्याचा दृष्टीने एक नव्हे दोन नव्हे तर तीन कांद्याची पोती छोट्या कांदा विक्रेत्यास उचलून खांद्यावर दिली. सूट बुटात असणारा हा एक मोठा अधिकारी आहे हे त्या व्यापाऱ्यास माहीत नाही आणि आपण ही पोती उचलून देत असताना आपण जिल्हाधिकारी आहे हे विसरून मदत केली. मात्र हे क्षण चित्र त्यांचे मित्र उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी टिपले.
हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी. निवडणूक पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबई येथे बैठकीसाठी आले होते. यावेळी अचानक ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का!! हाक ऐकू आली. जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांनी लगेच कोणताही विचार न करता त्यांनी तीन कांद्याची पोती उचलून डोक्यावर दिली. त्यांच्याबरोबर उपवनसंरक्षक राहुल पाटील काही अंतरावर होते त्यांनी ही हे क्षण आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपले याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांना नव्हती. तीन वेळा कांद्याचे पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना राहुल पाटील यांना वाटले की जिल्हाधिकारी दयानिधी यांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. असे अधिकारी खरोखर एक वेगळी छाप पडतात हे नक्की!
फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही. खरंतर तीन वेळा कांद्याचे पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा वागणारा हा आमचा मित्र राजा दयानिधी.. जिल्हाधिकारी सांगली राहुल पाटील (आय एफ एस).