क्रीडा संकुल कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:18+5:302021-04-16T04:26:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मिरज कोविड रुणालयातील स्थिर रुग्णांना पुढील उपचारासाठी याठिकाणी आणण्यात येत असून सोमवारपासून इतर रुग्णांवरही उपचार सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट देऊन यंत्रणेच्या तयारीची पाहणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी भेट देऊन पहाणी केल्यानंतर कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, गेल्यावर्षी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून आताही अधिक कार्यक्षमतेने सेवा म्हणून काम करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे व कोरोना नियंत्रणासाठी प्राधान्य द्यावे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. सुबोध उगाणे, डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.