जिल्ह्याचे किमान तापमान २२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:57+5:302021-03-04T04:47:57+5:30
सांगली : एकीकडे कमाल तापमान ३९ अंशापर्यंत वाढले असताना किमान तापमानानेही मोठी झेप घेतली. मंगळवारी किमान तापमान अचानक २२ ...
सांगली : एकीकडे कमाल तापमान ३९ अंशापर्यंत वाढले असताना किमान तापमानानेही मोठी झेप घेतली. मंगळवारी किमान तापमान अचानक २२ अंशापर्यंत वाढले. चोवीस तासात ३ अंशाने वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सूर्य आग ओकत असल्याने आता उन्हाच्या तीव्र झळांचा आलेख दररोज वाढत आहे. कमाल तापमान ३९ अंशापर्यंत गेले आहे. चार दिवसांपूर्वी ते ३५ अंशाच्या घरात होते. किमान तापमान सोमवारी १९ अंश सेल्सिअस होते. आता ते २२ अंशापर्यंत वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत किमान तापमान ५ अंशाने, तर कमाल तापमान ३ अंशाने अधिक आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवडाभर जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ ते ३९, तर किमान तापमान २१ ते २२ अंशाच्या घरात राहणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका नाही. मंगळवारी सांगली, मिरज शहरातील वातावरण अंशत: ढगाळ होते. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत.