जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित
By admin | Published: May 12, 2017 12:06 AM2017-05-12T00:06:09+5:302017-05-12T00:06:09+5:30
जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित
सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील विशेष घटक योजनेतील चापकटर, स्प्रे पंप खरेदी घोटाळ्याप्रकरणी जबाबदार धरून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांना गुरुवारी राज्यशासनाने निलंबित केले. कृषी विभागाकडील स्पे्र पंप, चापकटर खरेदीची निविदा बेकायदेशीररीत्या बाजारभावापेक्षा जादा दराने काढली होती. तरीही या खरेदीत दर करार समितीने मंजुरी देऊन जिल्हा परिषदेचे लाखो रुपयाचे नुकसान केले होते. याचा मुद्दा जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांनी उपस्थित करून शासनाने तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने गुरुवारी दिलीप पाटील यांना निलंबित केले. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी लावली आहे. या कारवाईचे आधीच संकेत मिळाल्यामुळे दिलीप पाटील रजेवर गेले आह