सांगली लोकसभेसाठी 'स्वाभिमानी'च्या महेश खराडेंनी घोड्यावरुन जात दाखल केला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:46 PM2024-04-20T13:46:43+5:302024-04-20T13:49:10+5:30
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावरून जाऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज ...
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावरून जाऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीला प्रारंभ झाला. महेश खराडे घोड्यावर स्वार झाले, तर धोतर नेसलेले शेतकरी बैलगाडीत बसले होते. रॅलीमध्ये उसाने सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये शेतकरी सहभागी झाले होते.
रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पवार, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित हलीगले, भरत चौगुले, राजेंद्र माने आदींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज सादर केला.