संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष दाेन वर्षासाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:43+5:302020-12-30T04:37:43+5:30
कासेगाव : संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (रा. कासेगाव, ता. वाळवा) यास खंडणी मागणे, शासकीय अधिकाऱ्यास धमकावणे, सरकारी ...
कासेगाव : संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (रा. कासेगाव, ता. वाळवा) यास खंडणी मागणे, शासकीय अधिकाऱ्यास धमकावणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कारणांमुळे सांगली जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करीत असल्याचे आदेश वाळवा दंडाधिकारी यांनी दिले आहेत.
संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष असलेला सुयोग औंधकर याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सांगली शहर पोलीस ठाण्यात गर्दी मारामारी, विश्रामबाग येथे सरकारी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणणे, इस्लामपूर येथील सहायक निबंधक, तालुका कृषी अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे भीती दाखवून खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा, असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. त्यास सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, याकरिता कासेगाव पोलीस ठाण्याकडून उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी वाळवा यांनी कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्यास दोन वर्षे निर्बंध घालण्यात आले आहेत, तर सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहेत.
फाेटाे : २९ सुयाेग औंधकर