इस्लामपूर येथे रविवारी हॉकीची जिल्हा निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:21+5:302021-09-09T04:32:21+5:30
इस्लामपूर : दि हॉकी सांगली संघटनेकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ महिला खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्याकरिता रविवारी इस्लामपूर येथे निवड ...
इस्लामपूर : दि हॉकी सांगली संघटनेकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ महिला खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्याकरिता रविवारी इस्लामपूर येथे निवड चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. जे. एस. पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, १ जानेवारी २००२ नंतर जन्म झालेले खेळाडू कनिष्ठ गटासाठी खेळतील. तेलंगणा येथे ऑक्टोबर महिन्यात कनिष्ठ गट व वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी इंडिया स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी राज्य संघाची निवड चाचणी जिल्हास्तरावर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच खेळाडूंना बालेवाडी (पुणे) येथे निवड चाचणीत सहभागी करून घेतले जाणार आहे.
इच्छुक खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याच्या प्रतीसोबत रविवार, दि.१२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जयंत पाटील खुले मैदान (इस्लामपूर) येथे उपस्थित राहायचे आहे. सोबत जन्मदाखला, हॉकी इंडिया नोंदणी अर्ज, बोनाफाईड, आधार कार्ड अशी कागदपत्रे आणावयाची आहेत. दि हाॅकी सांगली या संघटनेत नोंदणी नसलेल्या खेळाडूंनी आधी त्यांचे नाव संघटनेकडे नोंदणी करून घ्यावे.
निवड चाचणी प्रशिक्षक प्रा. संतोष जाधव, अनिल शिंदे, अशोक जाधव, अतुल मोरे, दत्ता पाटील, सचिव धनंजय राऊत यांनी खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.