जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’
By admin | Published: October 5, 2014 09:31 PM2014-10-05T21:31:08+5:302014-10-05T23:03:25+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पी. ओ. गोसावी
सांगली : विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’ (मद्य विक्री बंद) जाहीर करण्यात आला आहे. दि. १३ ते १५ आॅक्टोबर असा हा ड्राय डे असेल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पी. ओ. गोसावी यांनी दिली. ते म्हणाले की, १५ आॅक्टोबरला मतदान होत असून त्यापूर्वी दोन दिवस अगोदर दारु विक्री बंद आहे. १३ रोजी सायंकाळी पाच ते १४ व १५ रोजी दिवसभर दुकाने बंद राहतील. मतदानादिवशीही दुकाने बंद राहतील. सायंकाळी ६ वाजता दुकाने सुरु होतील. मतमोजणी १९ आॅक्टोबरला होणार आहे. यादिवशी दिवसभर दुकाने बंद राहणार आहेत. दि. २० रोजी पूर्ववत दुकाने सुरु राहतील. चोरुन दारुची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)