वाळवा तालुक्यात बहुरंगी लढती
By admin | Published: February 13, 2017 11:42 PM2017-02-13T23:42:21+5:302017-02-13T23:42:21+5:30
बागणीतून संभाजी कचरे यांचे बंड : जि. प.ला ४0, तर पं. स.ला ७७ उमेदवार रिंगणात
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ जागांसाठी ४0, तर पंचायत समितीच्या २२ जागांसाठी ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. जि. प.च्या ५९, तर पं. स.च्या १३४ अशा एकूण १९३ उमेदवारांनी अर्ज सोमवारी मागे घेतले. तालुक्यात उत्कंठा लागून राहिलेल्या बागणी जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने खळबळ उडाली आहे.
येथील पंचायत समितीच्या बचत धाममध्ये निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्यासमोर अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. जि. प.च्या कासेगाव आणि वाळवा गटातून दुरंगी, तर अन्य ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होतील. पंचायत समितीसाठी नेर्ले, साखराळे, वाळवा, पडवळवाडी, येलूर या गणांमध्ये दुरंगी, तर १७ गणांमध्ये बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी, रयत विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी निवडणुकीचे रिंगण रंगणार आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय आणि पक्षनिहाय उमेदवार असे -
रेठरेहरणाक्ष - धनाजी बिरमुळे (राष्ट्रवादी), मारुती मदने (काँग्रेस), शरद अवसरे (विकास आघाडी), सुभाष माळी (शिवसेना). बोरगाव- जितेंद्र पाटील (काँग्रेस), कार्तिक कुमार पाटील (राष्ट्रवादी), मिलिंद पाटील (विकास आघाडी), युवराज निकम (शिवसेना), संदीप यादव (प्रहार जनशक्ती).
कासेगाव- संगीता संभाजीराव पाटील (राष्ट्रवादी), माधुरी सुजित पाटील (विकास आघाडी). वाटेगाव- संध्या आनंदराव पाटील (राष्ट्रवादी), सोनाली राहुल पाटील (विकास आघाडी), राजश्री सिध्देश्वर पाटील (शिवसेना).
पेठ- जगन्नाथ माळी (विकास आघाडी), सुनील तवटे (राष्ट्रवादी), धनपाल माळी (शिवसेना). वाळवा- सुषमा अरुण नायकवडी (विकास आघाडी), स्मिता विक्रम भोसले (राष्ट्रवादी).
कामेरी- छाया अनिल पाटील (राष्ट्रवादी), सुरेखा मोहन जाधव (विकास आघाडी), रेखा प्रकाश पाटील (शिवसेना).
चिकुर्डे- संजीव पाटील (राष्ट्रवादी), माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील (शिवसेना), शहाजी पाटील (विकास आघाडी), पोपट भोसले, आनंदराव सरनाईक (अपक्ष).
बावची- राजश्री प्रकाश एटम (राष्ट्रवादी), शर्मिला सुभाष देशमुख (विकास आघाडी), रेखा दिनकर मस्के, संगीता भीमराव शिंदे (अपक्ष).
बागणी- वैभव शिंदे (राष्ट्रवादी), सागर खोत (विकास आघाडी), हंबीरराव पाटील (काँग्रेस), माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे, शंकर हाके (अपक्ष) उमेदवार आहेत.
येलूर- निजाम मुलाणी (विकास आघाडी), विलास देसावळे (राष्ट्रवादी), नंदकिशोर नीळकंठ (शिवसेना).
पंचायत समितीचे पक्षनिहाय उमेदवार असे-
कि. म. गड- विजया सुनील पोळ (राष्ट्रवादी), अनिता मधुकर डिसले (काँग्रेस), वैशाली शशिकांत साळुंखे (विकास आघाडी), सुरेखा शंकर पाटील (शिवसेना).
रेठरेहरणाक्ष- सचिन हुलवान (राष्ट्रवादी), गणेश हराळे (काँग्रेस), सुहास चव्हाण (विकास आघाडी), अर्जुन देशमुख (शिवसेना).
ताकारी- रुपाली प्रकाश सपाटे (राष्ट्रवादी), प्रियांका शरद सोळवंडे (काँग्रेस), सारिका नितीन देवकुळे (विकास आघाडी), मालन जगन्नाथ साठे (शिवसेना).
बोरगाव- विजय खरात (काँग्रेस), अविनाश खरात (राष्ट्रवादी), हसन मुलाणी (विकास आघाडी), विकास हुबाले (शिवसेना).
नेर्ले- राजश्री भीमराव फसाले (राष्ट्रवादी), शहनाज इस्माईल मुलाणी (विकास आघाडी). कासेगाव- माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील (राष्ट्रवादी), आकाराम पाटील (विकास आघाडी), अर्जुन मदने (शिवसेना).
वाटेगाव- शुभांगी प्रकाश पाटील (राष्ट्रवादी), शुभांगी हेमंत मुळीक (विकास आघाडी), सारिका अर्जुन सूर्यवंशी (शिवसेना), भाग्यश्री राहुल चव्हाण (अपक्ष).
रेठरेधरण- दादासाहेब राऊत (विकास आघाडी), शंकर चव्हाण (राष्ट्रवादी), विजय कवठेकर (अपक्ष).
पेठ- वसुधा विकास दाभोळे (विकास आघाडी), सुनीता संतोष देशमाने (राष्ट्रवादी), वैशाली अधिक गुरव (शिवसेना).
साखराळे- रंजना शिवाजी माने (राष्ट्रवादी), अलका अशोक पाटील (विकास आघाडी). वाळवा- माजी पं. स. सदस्य नेताजी पाटील (राष्ट्रवादी), नजीर वलांडकर (विकास आघाडी).
पडवळवाडी- दीपाली अनिल थोरात (राष्ट्रवादी), वैशाली शंकर खोत-जाधव (विकास आघाडी).
कामेरी- प्रतिभा छगन पाटील (राष्ट्रवादी), सविता शहाजी पाटील (विकास आघाडी), स्वाती हंबीरराव पाटील (मनसे), वंदना रणजित पाटील (अपक्ष).
ऐतवडे बुद्रुक- अलका रामचंद्र काळुगडे (विकास आघाडी), धनश्री धनाजी माने (राष्ट्रवादी), मनीषा धनाजी गायकवाड (शिवसेना), दीपाराणी दिलीप शेखर (अपक्ष). चिकुर्डे- आशाताई अनिल पाटील (विकास आघाडी), सुप्रिया अजय भोसले (काँग्रेस), वैजयंता रघुनाथ पवार (शिवसेना), स्वाती सचिन पाटील (अपक्ष).
कुरळप- पांडुरंग पाटील (राष्ट्रवादी), सुनील पाटील (विकास आघाडी), अतुल पाटील (शिवसेना), विजय भालकर (मनसे), स्वप्नील पाटील (अपक्ष).
गोटखिंडी- आनंदराव पाटील (काँग्रेस), सी. एच. पाटील (विकास आघाडी), रामचंद्र घाटे (शिवसेना), आनंदराव थोरात (पश्चिम महाराष्ट्र स्वतंत्र पक्ष).
बावची- संभाजी मस्के (राष्ट्रवादी), आशिष काळे (विकास आघाडी), परशुराम बामणे (शिवसेना).
कारंदवाडी- जनार्दन पाटील (राष्ट्रवादी), अमोल पाटील (काँग्रेस), सचिन सावंत (विकास आघाडी), राजाराम यादव (शिवसेना), उत्तम फाळके (अपक्ष).
बागणी- आसमा शिकलगार (राष्ट्रवादी), मनीषा गावडे (विकास आघाडी), सायराबी हैदर नायकवडी (विकास आघाडी, बंडखोर). बहाद्दूरवाडी- बाजीराव जाधव (राष्ट्रवादी), मारुती खोत (विकास आघाडी), संदीप मगदूम (शिवसेना). येलूर- माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक (विकास आघाडी), संदीप जाधव (काँग्रेस). (वार्ताहर)