खानापूरमध्ये ज्ञानदेव बाबर यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:25+5:302021-08-12T04:30:25+5:30
ओळ : खानापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांच्याकडे दिला. खानापूर : नगरपंचायतीचे ...
ओळ : खानापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांच्याकडे दिला.
खानापूर : नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष ज्ञानदेव संपतराव बाबर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांच्याकडे नुकताच दिला. बाबर यांनी कार्यकाल संपल्याने स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. बाबर यांच्या राजीनाम्यामुळे उपनगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खानापूर नगरपंचायतीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास (नाना) शिंदे व आमदार अनिल (भाऊ) बाबर समर्थक गटाची संयुक्त सत्ता आहे. सव्वा सव्वा वर्षे विभागून दाेन्ही गटांचा कारभार सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही गटांच्या चार जणांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. आता उपनगराध्यक्षपदाची चौथी निवड होणार आहे.