लस आली तरी गाफील राहू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:36+5:302021-01-17T04:23:36+5:30
पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ मंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण रुग्णालयाचे ...
पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ मंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अधिक पाटील यांना पहिली लस टोचण्यात आली.
डॉ. कदम म्हणाले, तालुक्यातून लसीकरणासाठी सध्या ७२७ जणांची नोंदणी झाली आहे. ही लस सामान्य नागरिकांना दिली जाणार नाही. या लसीबाबत गैरसमज बाळगू नये. राज्यातील नागरिकांना लवकरात लवकर ही लस उपलब्ध होणेसाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारती हॉस्पिटलमध्येही ही लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अरुण लाड म्हणाले, कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे; पण खबरदारी महत्त्वाची आहे. प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, उपसभापती दीपक मोहिते, प्रांताधिकारी गणेश मरकड, उपनगराध्यक्ष सुनीता कांबळे, खाशाबा दळवी, तहसीलदार निवास ढाणे, मारुती चव्हाण, वैद्यकीय अधिकारी अधिक पाटील, डॉ. रागिणी पाटील, डॉ. बालाजी भिसे उपस्थित होते.
फोटो-१६पलूस१.२.३