पाऊस येईपर्यंत गावांची वीज तोडू नका-: शिवाजीराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:36 AM2019-06-06T00:36:49+5:302019-06-06T00:37:25+5:30
शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन ...
शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी सूचना आ. शिवाजीराव नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात ऊर्जामित्र बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.
आ. नाईक म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी क ोणत्याही परिस्थितीत गावाच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये. शासनाने सौरऊर्जेवर पाणी पंप वापरावेत असे सांगितले असले तरी, नदीकाठच्या शेतकºयांना याबाबत सक्ती करु नये. नदीकाठाला पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येते. काहीवेळा पूरपरिस्थिती उद्भवते. त्यामुळे सौरऊर्जा युनिट बसविणे शेतकºयांना अडचणीचे व नुकसानकारक आहे. या बाबींची दखल घेऊन नदीकाठी शिथिलता द्यावी.
यावेळी कार्यकारी अभियंता रजनीकांत साखरे, उपअभियंता पी. एम. बुचडे, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, विजय पाटील, सागर पाटील, उपकार्यकारी अभियंता आर. बी. सूर्यवंशी, आर. बी. कसबे, ए. आर. कोरे, आर. एम. शेळके, पी. के. भिलवडे, अमर पाटील, आर. वाय. माने, धीरज वाघ, एम. एच. रसाळ, नगरसेवक बंडा डांगे, सौ. सीमा कदम उपस्थित होते.
अडचणी सोडविल्या...
वीज बिल, पाणी उपसा पंप, कनेक्शन व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि इतर शेकडो वीज ग्राहकांच्या अडचणी या बैठकीत सोडविण्यात आल्या.
शिराळा येथील ऊर्जामित्र बैठकीत आमदार शिवाजीराव नाईक यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली.