महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:53 PM2017-10-05T16:53:01+5:302017-10-05T16:56:29+5:30
२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे.
सांगली,5 : २००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे.
शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थी व समाज कल्याण विभाग यांच्यातील मध्यस्थी म्हणून महाविद्यालयांनी काम केले आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याचे काम महाविद्यालयांनी केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडले आहेत. आता त्यांनी घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम कशी वसूल करणार? नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळ्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरु ठेवावी. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा. शिष्यवृत्ती वसूलीबाबत महाविद्यालयांना दिलेली पत्रे रद्द करावीत, अशी मागणी केली आहे.
यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कसणे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुरळपकर, उज्वला पाटील, सचिव डॉ. एस. आर. पाटील, खजिनदार डॉ. बी. व्ही. ताम्हणकर उपस्थित होते.