कवठेमहांकाळला वीज कनेक्शन तोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:19+5:302021-07-18T04:19:19+5:30

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील वीजबिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलने तहसीलदार बी. ...

Do not disconnect the power connection during Kavathemahankal | कवठेमहांकाळला वीज कनेक्शन तोडू नका

कवठेमहांकाळला वीज कनेक्शन तोडू नका

Next

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील वीजबिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलने तहसीलदार बी. जे. गोरे यांना दिले. जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, रमजान मुल्ला, व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष धनाजी जाधव, शहराध्यक्षा मीनाक्षी माने, युवती तालुकाध्यक्ष स्नेहा जाधव, दीपाली जाधव यांनी निवेदन दिले.

कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन असून, तो अजून पूर्ण उठलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी सुरळीत नाही. शेतकरी हवालदिल झाला असून, महावितरण कंपनीने अवाच्या सव्वा वीज बिले दिली आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी दादागिरीची पद्धत अवलंबली आहे. तिसऱ्या लाटेचे संकट पुढे असताना परत शासन कधी लाॅकडाऊन करेल, हे सांगता येत नाही. काहीही सुरळीत नसताना वीज बिलाचे संकट समोर आले आहे. याचा विचार करून दिलासा द्यावा. सक्तीची वीज बिल वसुली, कनेक्शन तोडणी थांबविण्यासाठी आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.

यावेळी नितीन पाटील, अकमन पठाण, शहाजी डोंबाळे उपस्थित होते.

Web Title: Do not disconnect the power connection during Kavathemahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.