आंदोलनाचे दुकान चालवणाऱ्यांचे सर्टिफिकेट नको : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:53 AM2018-02-27T00:53:37+5:302018-02-27T00:53:37+5:30
बोरगाव : खंडणी कोण गोळा करते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आंदोलनाचे दुकान चालवणाऱ्यांनी मला कोणतेही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. माझ्यासोबत लोक व जनमान्यता आहे.
बोरगाव : खंडणी कोण गोळा करते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आंदोलनाचे दुकान चालवणाऱ्यांनी मला कोणतेही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. माझ्यासोबत लोक व जनमान्यता आहे. ज्यांची उंची नाही, अशांनी माझी बरोबरी करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना दिला. कºहाड-तासगाव रस्ता रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन सरकारला अधिग्रहण करू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दह्यारी (ता. पलूस) येथे शेतकरी, व्यापारी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. कºहाड-तासगाव-शिरढोण-जत या राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरु आहे; तर दुसºया टप्प्यातील कामातील वळण रस्ते व रुंदीकरणासाठी ताकारी, दुधारी, दह्यारी, तुपारी, घोगाव येथील शेतकºयांच्या पिकाऊ जमिनी तसेच ताकारी येथील मुख्य बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे. याला विरोध करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी धीर धरावा. दुसºया टप्प्यातील कामाला सध्या स्थगिती मिळाली आहे. शेतकºयांना विश्वासात घेऊन तडजोडीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना कटिबध्द आहे. शासन शेतकºयांच्या जमिनी कवडीमोल दराने हडप करणार असेल तर, आम्ही गप्प बसणार नाही. संघर्षाचे ‘टेंडर’ माझ्या एकट्याकडे देऊ नका. शेतकरी, व्यापाºयांनी एकत्र येऊन शासनाविरोधात लढा देण्यासाठी संघटित व्हा. त्याला पूर्णपणे पाठिंबा राहील.माझा विकासाला विरोध नाही. मात्र शेतकºयांना वेठीस धरुन शासन विकास साधणार असेल तर, त्याला आमचा कडवा विरोध राहील.
ते म्हणाले, हा रस्ता डोंगराकडील बाजूने तसेच शेतजमीन जाणार नाही, अशा पध्दतीने करता येतो का, यासाठी जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा करु. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणाला काहीही करता येणार नाही. रस्त्याच्या उंचीमुळे शेतकºयांच्या जमिनीत पाणी साचू नये यासाठी जागोजागी मोºया उभ्या करुन निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यास भाग पाडणार आहे.
सदाभाऊ खोत यांच्या इंदापूर येथील भाषणाचा समाचार घेताना खासदार शेट्टी म्हणाले, गेली २० वर्षे मी अनेक आंदोलने केली आहेत. मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. खंडणीबहाद्दर आणि आंदोलनाची दुकानदारी चालवणाºयांना अशा क्लासची गरज आहे. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता ए. जी. आडमुठे, कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या सभापती शुभांगी पाटील, भागवत जाधव, रवीकिरण माने, विकास देशमुख, प्रवीण पाटील, महेश खराडे, महावीर पाटील, अमर पाटील, अभिनंदन पाटील उपस्थित होते.
सागर खोत यांचा बार फुसका!
खासदार राजू शेट्टी यांची बैठक उधळून लावण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी दिला होता. परंतु दोन तासाहून अधिक वेळसुरु असलेल्या बैठकीत रयत क्रांतीचा एकही चेहरा दिसला नाही. त्यामुळे सागर खोत यांचा बैठक उधळवण्याचा बार फुसका निघाला. याबाबत खा. शेट्टी यांना विचारले असता, ‘सदा माझी बरोबरी करू शकत नाही. मग टीचभर पोरगं माझं काय वाकडं करणार?’ अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.