भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

By admin | Published: April 29, 2017 12:09 AM2017-04-29T00:09:01+5:302017-04-29T00:09:01+5:30

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

Do not ignore the silly sand rains | भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

Next


ओढापात्राची चाळण : कर्नाटकात वाळू पार्सल; महसूल विभागाकडून छापे टाकण्याचे नाटक
संख : महसूल विभाग, उमदी पोलिस ठाणे यांच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील भिवर्गी ओढापात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरू आहे. ओढापात्रात मोठेमोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकात ही वाळू पार्सल केली जात आहे. वाळू तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे.
महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने सापडत नाहीत. वाळू तस्करीमुळे काळ्या सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
पूर्व भागातील भिवर्गी गावची लोकसंख्या चार हजार आहे. गावाजवळ ओढा असून, पात्र मोठे आहे. ओढापात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून सुमारे ५० ट्रॅक्टरने वाळू तस्करी केली जात आहे. कमी कालावधित जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. मजुरांकडून ट्रॅक्टरमध्ये चाळण लावून वाळू भरली जाते. त्या वाळूचे कर्नाटकमध्ये किंवा शेतामध्ये डेपो मारले जातात. मजूर गाडी भरण्यासाठी २५० ते ३०० रुपये घेतात. डिझेल, मजुरी, ड्रायव्हरचा पगार वजा जाता एका खेपेला ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये राहतात, तर टिपरला ५ ते ७ हजार रुपये राहतात. ट्रॅक्टरच्या खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.
या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. आज प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महिन्यावर ठरवून ट्रॅक्टर आणलेले आहेत. पै-पाहुणे, नातेवाईकांची वाहने गुंतविलेली आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. (वार्ताहर)
पाण्याची पातळी खालावणार
बेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर होणार आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत गेली आहे.

Web Title: Do not ignore the silly sand rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.