कसबे डिग्रजमधील पंचनामे तत्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:42+5:302021-08-01T04:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : पूर ओसरू लागल्याने मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : पूर ओसरू लागल्याने मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
ते म्हणाले की, नुकसानीची माहिती तत्काळ संकलित करणे गरजेचे आहे. गावामध्ये सर्वत्र दलदल असून साफसफाईला प्राधान्य द्यावे. पूरग्रस्त कुटुंबांना तत्काळ धान्यवाटप सुरू करा. सध्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असून पाणीपुरवठा सुरू करा. गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याबाबत प्रस्ताव द्यावा. महापुरामुळे पशुधनाबाबत आरोग्य शिबिर सुरू करा. महापुराने बाधित शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत.
महापुरामुळे मगरींचा उपद्रव वाढल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली असता वन विभागाला याबाबत सूचना देण्यात येतील, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. चौधरी यांनी पूरग्रस्त भागास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
या वेळी तहसीलदार डी.एस. कुंभार, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, मंडलाधिकारी विजय तोडकर, विस्तार अधिकारी आर. एल. गुरव, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम उपस्थित होते.
310721\img-20210731-wa0050.jpg
कसबे डिग्रजमधील पूरग्रस्त लोकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी