सांगलीत रुग्णालयाच्या बिलावरून डॉक्टरला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:30+5:302021-06-11T04:19:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील गणेश नगरमध्ये वैद्यकीय उपचाराच्या बिलावरून तिघांनी डॉक्टरला धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. याप्रकरणी डॉ. ...

Doctor pushed from Sangli hospital bill | सांगलीत रुग्णालयाच्या बिलावरून डॉक्टरला धक्काबुक्की

सांगलीत रुग्णालयाच्या बिलावरून डॉक्टरला धक्काबुक्की

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील गणेश नगरमध्ये वैद्यकीय उपचाराच्या बिलावरून तिघांनी डॉक्टरला धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. याप्रकरणी डॉ. संजय बबनराव लवटे (रा. दत्तनगर, सांगली) यांनी परशुराम दराप्पा गोयकर, श्रीकांत शिवाजी गोयकर (दोघेही रा. चैतन्यनगर, सांगली) व एका अनोळखी व्यक्तीविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गणेश नगर जलतरण तलावाजवळ डॉ. लवटे यांचे साईना क्लिनिक ॲण्ड हेल्थ सेंटर नावाचे रुग्णालय आहे. संशयित परशुराम गोयकर याच्या भावाला कोरोना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. १८ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गोयकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे बिल दिले होते. मंगळवार, दि. ८ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित रुग्णालयात आले व त्यांनी या बिलात एक हजार रुपये कशाचे जास्त लावले आहेत, म्हणत डॉक्टरांना दमदाटी सुरू केली. इतर संशयितांनी धक्काबुक्की करत डॉ. लवटे यांच्या अंगावरील पीपीई किटही फाडून टाकले. या गोंधळात रुग्णालयात असलेला ऑक्सिजन सिलिंडरही खाली पडला व त्याचे नुकसान झाल्याचे व तुला बरबाद करून सोडू, अशी धमकी दिल्याचेही लवटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघा संशयितांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Doctor pushed from Sangli hospital bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.