सांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:55 AM2018-09-24T11:55:20+5:302018-09-24T12:04:22+5:30
सांगली येथील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
सांगली : येथील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. गर्भपातसाठी तो रुग्णांना डॉ. रुपाली चौगुलेकडे पाठवत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्याने गर्भलिंगनिदान केलेल्या रुग्णांना चौगुलेकडे पाठवल्याचा संशय आहे.
चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका एमआर सह तीन डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ. रुपाली चौगुले, डॉ. विजयकुमार चौगुले, एमआर सुजित कुंभार, डॉ. अविजित महाडिक यांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. रुपाली कडे केलेल्या तसेच रुग्णाणकडे केलेल्या चौकशीत विटा येथील डॉ. अभिजित महाडिक रुपालीकडे रुग्ण पाठवत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या पथकाने रविवारी पहाटे डॉ. महाडिक याच्या हॉस्पिटलवर छापा टाकला होता.
यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याने गर्भलिंगनिदान केलेले रुग्ण रुपालिकडे पाठवल्याचा संशय आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.