मिरजेत डॉक्टर्स व सीएंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:18 AM2021-07-04T04:18:10+5:302021-07-04T04:18:10+5:30
मिरज : रोटरी क्लबतर्फे डॉक्टर दिन व चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरा झाला. महापालिकेच्या दहा डॉक्टरांसह ३० डॉक्टरांचा व चार ...
मिरज : रोटरी क्लबतर्फे डॉक्टर दिन व चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरा झाला. महापालिकेच्या दहा डॉक्टरांसह ३० डॉक्टरांचा व चार चार्टर्ड अकाउंटंट यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. संयोजन रोटरीचे अध्यक्ष गिरीश लांडगे, सचिव मंदार वाटवे, प्रा. रवींद्र फडके, डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, अभिजित जोशी, अभय गुळवणी आदींनी केले.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, रोहिणी कुलकर्णी. अक्षय पाटील, मंजुषा दोरकर, अंजली धुमाळ, रेखा खरात, नौसिन कापशीकर, ऐश्वर्या लांडगे व सुमन अनिगोळ यांचा सत्कार झाला. खासगी डॉक्टर रामचंद्र पाठक, मिलिंद कुलकर्णी, सोमशेखर पाटील, सुनील कुलकर्णी, चंद्रशेखर हळिंगले, सुजय कुलकर्णी, संतोष कुलगोड, राजेंद्र गायकवाड, प्रदीप डोर्ले, संदीप देवल, प्रवीण डोर्ले व माजिद नायकवडी यांचा सत्कार झाला. नियमित योगासने करणाऱ्या डॉ. अपर्णा पुजारी, रूपाली सरडे, अश्विनी कोळेकर, मयुरी फडके, जय शहा यांना गौरवण्यात आले. मिरजेतील पहिले सीए वाय. पी. लेले, भूपालसिंग सुल्ह्यान, सिद्धार्थ मजती यांचाही सन्मान झाला. या वेळी संगीता डोंगरे, आरती आचार्य, अंजली पाटील, अनुराधा आचार्य, सायली लोनिष्ठे, तेजस्विनी शिरगुप्पे, विद्युल्लता गारे, वंदना देशमुख, स्नेहल मूलचंदानी, जयंती आचार्य, दीपाली जाधव, प्रीती कुकरेजा, मीनाक्षी फडके आदी उपस्थित होते.