सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:27 AM2020-04-27T10:27:53+5:302020-04-27T10:28:32+5:30

वटहुकूमातील तरतूद अशी... केंद्र सरकारने १७९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात’ बदलाचा वटहुकूम काढला असून, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास, पाच लाखांचा दंड अशी तरतूद आहे. याचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे.

Doctors have been attacked 27 times in the last ten years in the district | सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

googlenewsNext
ठळक मुद्देवटहुकूमामुळे मिळणार संरक्षण : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना आधार; वादावादीच्या प्रकारांना आळा बसणार

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांत २७ वेळा डॉक्टरांवर हल्ले

सांगली : जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात सातवेळा डॉक्टरांवर हल्ल्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. डॉक्टरांना शिवीगाळ, रुग्णालय तोडफोडीच्या २७ घटना घडल्या असल्या तरी, इतर अनेक घटना आपसातच मिटविण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज, विटा येथे अशा घटना घडल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने वटहुकूम जारी करत, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद केली आहे.


मिरजेत रुग्णालयाचे नुकसान, डॉक्टरांवर हल्ले
रूग्णावर वेळेत उपचार केला नाही, म्हणून आठ वर्षापूर्वी डॉक्टरला मारहाण झाली होती. गेल्यावर्षी शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरच्या रुग्णालयाचीही रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली होती. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ बनल्यानंतर नातेवाईकांनी हा प्रकार केला होता. आठ महिन्यांपूर्वी अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली होती.


शासकीय रुग्णालयात डॉक्टर लक्ष्य
आठ वर्षापूर्वी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर हल्ला केला होता. तसेच रूग्णालयातील साहित्याची तोडफोडही केली होती. अशा घटना मिरज शासकीय रूग्णालयातही घडल्या आहेत. अनेकदा नेत्यांकडून शासकीय रूग्णालयात डॉक्टरांवर दबाव आणला जातो. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शासकीय रूग्णालयात तैनात असल्यानेही हल्ले, वादावादीचे प्रमाण कमी झाले आहे.


हल्ल्यांची कारणे
च्रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याच्या शक्यतेवरून हल्ले होतात
च्रुग्णावर उपचारास विलंब केल्यावरूनही वादावादी होते
च्बिलाच्या रकमेवरूनही रूग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वादाचा प्रकार होतो


कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्वांनाच समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे. आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे डॉक्टर, प्रशासनातील घटक, पोलिसांवर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही.
- सुहैल शर्मा, पोलीस अधीक्षक


नव्या वटहुकूमामुळे डॉक्टरांना संरक्षण मिळेल. हल्लेखोरांवर जरब बसेल. या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी ‘आयएमए’ पाठपुरावा करेल.
- डॉ. शशिकांत दोरकर,
अध्यक्ष, आयएमए, मिरज.


या वटहुकूमाचा फायदा शासकीय सेवेतील डॉक्टरांना होणार आहे. न घाबरता त्यांना सेवा बजाविता येणार आहे. हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. संतोष दळवी, उपवैद्यकीय अधीक्षक, शासकीय रूग्णालय.

Web Title: Doctors have been attacked 27 times in the last ten years in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.