श्वानदंशाने १२ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:50+5:302021-01-25T04:27:50+5:30
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने १२ जनावरे दगावली. यात शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे ...
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने १२ जनावरे दगावली. यात शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान पिले व दोन म्हसींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशुवैद्यकीय डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. मात्र वेळेत उपचार झाले नाहीत. आणखीनही जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रेबिज झाल्याचा संशय आहे. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यास तीही दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चाैकट
नुकसानभरपाईची मागणी
शासनाने लाखो रुपये खर्चून आवंढी येथे श्रेणी १ दर्जाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधली आहे