बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:16 PM2021-04-22T17:16:29+5:302021-04-22T17:20:00+5:30

Dog Miraj Sangli : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली.

The dog's mouth stuck in the jar for a week | बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

Next
ठळक मुद्देबरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफडॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना मिळाली माहिती

मिरज : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली.

शिवाजीनगर परिसरात आठवडाभर व्याकुळ होऊन ते फिरत होते. रहिवाशांना त्याची दया येऊनही काहीही करु शकत नव्हते. काही तरुणांनी बरणी काढण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रे घाबरुन पळून गेले. अखेर ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. कार्यकर्ते किरण नाईक, दिलीप शिंगाणा आदींनी प्रयत्न करुन कुत्र्याला पकडले.

अडकलेली बरणी काढून टाकली. तोपर्यंत तहान-भुकेने व्याकूळ झालेले कुत्रे तडफडत होते. बरणी काढली तरी निपचित पडले होते. कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. अन्न पोटात गेल्यानंतर त्याला हुशारी आली. त्याची नसबंदी करुन सोडणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नागरीकांनी प्लास्टीकच्या बरण्या, पिशव्या, डबे कचर्यामध्ये उघडून टाकू नयेत असे आवाहन केले. त्यांची मोडतोड करुन किंवा झाकण लाऊन विल्हेवाट लावावी असे ते म्हणाले.

 

 

 

Web Title: The dog's mouth stuck in the jar for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.