Crime News घरगुती कारण : कुमठेत पुतण्याकडून चुलत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:13 PM2020-05-19T20:13:40+5:302020-05-19T20:15:14+5:30
कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातून नेहमी त्यांच्यात वादावादी होत असे. सोमवारी दुपारी रोहित घरात झोपला असताना, लहान मुले दंगा करून झोपमोड करत असल्याच्या कारणावरून त्यांची पुन्हा वादावादी झाली होती.
तासगाव : कुमठे (ता. तासगाव) येथे पुतण्याने चुलते भीमराव नेताजी गाडे (वय ५५) यांचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना सोमवार, दि. १८ रोजी रात्री अकरा वाजता घडली. याप्रकरणी पुतण्या रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे (वय २१) याच्याविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातून नेहमी त्यांच्यात वादावादी होत असे. सोमवारी दुपारी रोहित घरात झोपला असताना, लहान मुले दंगा करून झोपमोड करत असल्याच्या कारणावरून त्यांची पुन्हा वादावादी झाली होती.
रात्री भीमराव गाडे गावातीलच समाजमंदिरात झोपायला गेले होते. तेव्हा मागून गेलेल्या रोहितने कोयत्याने वार करून भीमराव यांना गंभीर जखमी केले. त्यांचा आरडाओरड ऐकून काहीजण जमले. त्यानंतर रोहित तेथून निघून गेला. जखमी अवस्थेत भीमराव यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी भीमराव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी रोहितविरुद्ध चुलत्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.