घरगुती गॅसचे दर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:31+5:302021-08-20T04:31:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असतानाच, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ ...

Domestic gas price hiked by Rs 25 again; Now count Rs 863! | घरगुती गॅसचे दर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये!

घरगुती गॅसचे दर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६३ रुपये!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असतानाच, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. वाढतच चाललेल्या गॅसच्या दरवाढीने हातावरचे पोट असलेल्या कुटुंबाची अडचण होत असून मध्यमवर्गीयांचेही बजेट कोलमडले आहे.

धूर आणि चुलीपासून सुटका व्हावी यासाठी अनेकांनी गॅस सिलिंडरचा पर्याय निवडला आणि तो आता समाजातील प्रत्येक घटकाच्या सवयीचा झाला असताना, दरवाढीने मात्र, सर्वसामान्यांचे जीणे अडचणीचे केले आहे.

मंगळवारपासून गॅस सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढल्याने आता ग्राहकांना एका सिलिंडरसाठी ८६३ रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या सहा महिन्यात सिलिंडरच्या दरात सरासरी १४५ ते १६० रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनामुळे अगोदरच रोजगारास अडचणी आल्या आहेत. त्यातही आता सिलिंडर दर वाढल्याने मध्यमवर्गीयांना खरी झळ बसत आहे.

चौकट

वाढलेल्या किमती आवाक्याबाहेर

चार ते सहा सदस्य असलेल्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडर लागतो. तर अनेक घरात दीड महिन्याला सिलिंडर रिफील करावा लागतो. धान्ये, कडधान्यांचे वाढलेले दर, पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यात आता घरगुती गॅसचेही दर वाढल्याने वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

चौकट

पंधरवड्यात वाढला दर

* गेल्या सहा महिन्यात सलग गॅसचे दर वाढतच आहेत. जून आणि जुलै महिन्यातच फक्त दर स्थिर राहिले होते.

* या महिन्याच्या सुरुवातीला ८३८ रुपयांवर असलेला दर आता थेट २५ रुपयांनी वाढला आहे.

* स्वातंत्र्यदिनानंतर सुरू झालेल्या आठवड्याची सुरुवातच गॅस दरवाढीने झाली. यावेळी थेट २५ रुपयांनी दर वाढले आहेत.

चौकट

सबसिडीचा नाही पत्ता

घरगुती गॅसधारकांना शासनाकडून अनुदान देण्यात येते. कोरोना कालावधीत हे बंद ठेवण्यात आली आहे तर अनेकांना ते ‘सरेंडर’ करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनुदानाचा पत्ता नाही मात्र, दरवाढीची झळ सहन करावी लागत आहे.

चौकट

आठ महिन्यात १४५ रुपयांची वाढ

जानेवारी ७१०

फेब्रुवारी ७१०

मार्च ७८५.५०

एप्रिल ८३५

मे ८२५.५

जून ८३८

जुलै ८३८

१ ऑगस्ट ८३८

१७ ऑगस्ट ८६३

कोट

दर महिन्याला फक्त आणि दरवाढ सहन करत आहोत. आता शासनाने सांगावे आम्ही नेमके जगावे तरी कसे? अगोदरच काम नाही. मिळेल ते काम करून गुजराण सुरू असताना ही दरवाढ सहन होत नाही.

मेहरुन शेख, गृहिणी

कोट

ग्रामीण भागात राहत असतो तर ठीक होते. किमान पुन्हा चुली सुरू केल्या असत्या. शहरात चूल कशी लावणार? त्यामुळे आता शासनाने दरवाढ कमी करावी व दिलासा द्यावा.

सोनाली पवार, गृहिणी

Web Title: Domestic gas price hiked by Rs 25 again; Now count Rs 863!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.