वापरात नसलेल्या सायकली दान करा : जुनी सायकल फुलविणार नवी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 08:35 PM2019-12-30T20:35:50+5:302019-12-30T20:36:32+5:30

घरोघरी पडून असणाऱ्या अशा सायकली गोळा करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्या देण्यात येणार आहेत. ‘मैत्र’चे या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे.

 Donate unused bicycles: The new hope of growing old bicycles | वापरात नसलेल्या सायकली दान करा : जुनी सायकल फुलविणार नवी आशा

वापरात नसलेल्या सायकली दान करा : जुनी सायकल फुलविणार नवी आशा

googlenewsNext
ठळक मुद्देखेड्यांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्र’चा उपक्रम

सांगली : मुले पाचवी-सहावीत जातात आणि घरोघरी नव्या सायकली येतात. या सायकलींचा चार-पाच वर्षे वापर होतो. दहावी संपते आणि सायकल म्हणजे मुलांना जुनाटपणा वाटतो. त्या वापराअभावी घरोघरी परसात, टेरेसवर, जिन्याच्या वळचणीला पडून राहतात. त्या गंजतात आणि नंतर भंगारवाल्याच्या स्वाधीन केल्या जातात.

एकीकडे असा समृद्धीतून भंगाराकडे प्रवास सुरू असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील असंख्य मुले शाळेसाठी पायपीट करीत असतात. साधी सायकल घेण्याचीही आर्थिक क्षमता नसल्याने दोन-चार किलोमीटरची धुळवाट तुडवत ती शाळा गाठतात आणि सायंकाळी चालतच घरी परततात. विश्ोषत: मुलींसाठी हा प्रवास दररोज परीक्षा घेणारा ठरतो. या विद्यार्थ्यांसाठी पुण्याची मैत्र संस्था मदतीचा हात घेऊन पुढे आली आहे. घरोघरी पडून असणाऱ्या अशा सायकली गोळा करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्या देण्यात येणार आहेत. ‘मैत्र’चे या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे.

गतवर्षी आरग येथील हायस्कूलमधील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या आहेत. यंदाही हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वापराविना पडून असलेल्या सायकली दान देण्याचे आवाहन मैत्रच्यावतीने मेधा पूरकर, स्वाती मागीकर, वृंदा लिमये यांनी पालकांना केले आहे. अशा सायकलींना नवे रूपडे देऊन त्या लक्ष्मीवाडी शाळेतील गरजू मुला-मुलींना देण्यात येणार आहेत.

 

  • शिक्षणाची वाट झाली सोपी

सिंबायोसिस महाविद्यालयातील प्रा. आशिष देशपांडे यांच्याशी संवादातून सायकल संकलनाची संकल्पना सूचली. मैत्रने पुण्यातील रहिवासी सोसायट्यांसह पालक संघटनांना सायकली दान करण्याचे आवाहन केले. सायकली आहेत त्या अवस्थेत देण्याची विनंती केली.

  • आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मैत्रने या सायकलींची स्वच्छता, डागडुजी केली. त्या आरगला आणल्या व एका विशेष कार्यक्रमात त्यांचे वाटप केले. या सायकलींनी मुलांची शिक्षणाची वाट सोपी केली. एका सायकलवरून दोघे, तिघे शाळेला येऊ लागले.

Web Title:  Donate unused bicycles: The new hope of growing old bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.