Sangli: पणुंब्रे वारुणमध्ये ८ मार्चला 'डोंगरी संमेलन'; शेखर गायकवाड यांची संमेलानाध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:58 IST2025-03-01T15:58:04+5:302025-03-01T15:58:50+5:30
कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे १४ वे डोंगरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ मार्च रोजी आयोजित करण्यात ...

Sangli: पणुंब्रे वारुणमध्ये ८ मार्चला 'डोंगरी संमेलन'; शेखर गायकवाड यांची संमेलानाध्यक्षपदी निवड
कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे १४ वे डोंगरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व सनदी अधिकारी शेखर गायकवाड (पुणे) यांची तर कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील हरोलीकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक कवी वसंत पाटील आणि स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली.
शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुण यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडी नंतर ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाचे मैदानावर संमेलनाचे उद्घाटन आमदार सत्यजित देशमुख यांचे हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण तानाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक बळीराम पाटील चरणकर, डालमिया शुगरचे संतोष कुंभार, तानाजी पाटील आणि उद्योजक विश्वास डफळे आदिंच्या उपस्थितीत होणार आहे.
तिसऱ्या सत्रात कविसंमेलन होणार असून यामध्ये सुनील यावलीकर, किरण भावसार, वसंत पाटील, भीमराव धुळूबुळू, रघुराज मेटकरी, राजेंद्र टिळे, नंदू गुरव, विष्णू पावले, भारती पाटील, श्रीकांत शिंदे, जयश्री पवार, भगवान पाटील, नथुराम कुंभार, वनिता जांगळे आदींचा सहभाग आहे. सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी सुभाष कवडे भिलवडी हे करणार आहेत. चौथ्या सत्रात प्रसिद्ध ग्रामीण विनोदी कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांचे कथाकथन होणार आहे.