Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 02:39 PM2024-07-08T14:39:30+5:302024-07-08T14:40:14+5:30
Sharad Pawar : खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना एका संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Sharad Pawar ( Marathi News ) : खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत. कवठेएकंद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. "सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे आता मोटर बंद करायला कोण जाईल काय? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले.
“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले
खासदार शरद पवार म्हणाले, पिढीजात शेती करणारे आपण शेतकरी. एकेकाळी पाण्याची आपल्याकडे कमतरता होती. तेव्हा सांगलीत उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. आपण या क्षेत्रात एकच पीक घेतलं, ते म्हणजे ऊसाच पीक. शेतीला सारख, सारख पाणी दिल्यामुळे आज नाहीतर उद्या त्या शेतीच नुकसान होतं. एकाच पिकाचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत, असंही पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी स्वत:च्या शेतीचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितला. "माझी स्वत:ची २० एकर शेती आहे, ती जमीन आधी क्षारयुक्त होती. त्यामुळे उत्पन्नाची खात्री नव्हती. त्यावेळी ती जमीन मी दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतलं. आम्ही त्यावेळी जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढलं, हे पाणी काढण्यासाठी आम्हाला ४ वर्षे लागली. आज या जमिनीत काही ठिकाणी ऊस, काही ठिकाणी पेरु, काही ठिकाणी चिकू अशी पिक आहेत. आधी त्या शेतातील उत्पादन २० टक्के होतं, आता त्याच शेतातील उत्पादन ६५ टक्केच्या पुढं गेले आहे. हे फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी जी पाऊलं टाकावी लागतात ती टाकली म्हणून हे शक्य झालं, असंही खासदार शरद पवार म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान
"आपण ऊसाच पिक घेतो. मी यावर बोलतो तेव्हा अनेकांना राग येतो, राग येण्यासारखच मी बोलतो. त्याच कारण ऊसाच पिक म्हणजे माझ्या मते आळशाच पिक पिक.रान तयार केलं, त्या ठिकाणी बियाणं आणलं. लागण केली. त्यानंतर पहिली भांगलणी , दुसरी भांगलणी केली. हे सगळ झालं की फक्त तोडणीची तारीख कधी येते एवढचं आपण बघतो. एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायचा, असं सांगत खासदार शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले. "ऊस शेती करुन आम्ही जगाच्या आणि गावच्या राजकारणाची चर्चा करत बसतो. राजकारण करायचं असतं, पण तो आपला धंदा नाही. आपला प्रपंच सांभाळून मग ते करायचं असतं, असंही शरद पवार म्हणाले.
"क्षारपड जमिनीसाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे. ते खर्चिक आहे, त्या खर्चाची जबाबदारी सरकार ८० टक्के घेते. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे पण अतिरिक्त होता कामा नये. आपल्याकडे नदीकाठ हा काळ्यामातीचा असतो. आपल्याकडे काही लोकांना सवय आहे की, एकदा मोटर चालू केली की परत चार दिवस तिकडे बघतही नाहीत. आता तर सरकारने मोफत वीज झाली आहे, आता मोटर कोण बंद करायला जाणार आहे का? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहनी खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले.