काेराेनाबाबत हलगर्जीपणा नकाे : विक्रम सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:17+5:302020-12-29T04:26:17+5:30
जत : कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली म्हणून विद्यार्थ्यांनी बेजबाबदारपणे वागू नये. शाळेत येताना व परिसरात वावरताना योग्य खबरदारी घेऊन ...
जत : कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली म्हणून विद्यार्थ्यांनी बेजबाबदारपणे वागू नये. शाळेत येताना व परिसरात वावरताना योग्य खबरदारी घेऊन निरोगी राहावे, असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले.
जत येथील विक्रम फाैंडेशनच्यावतीने जत शहरातील के. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (जत), कन्या हायस्कूल (जत), एस.आर.व्ही एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (जत), राजे रामराव महाविद्यालय (जत), दि फ्रेंन्डस असोसिएशनचे जत हायस्कूल (जत) येथे कोरोना संसर्ग व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क, अरसॅनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फाैडेशन अध्यक्ष ॲड. युवराज निकम, उपाध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेवक निलेश बामणे, जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने, फिरोज नदाफ, गणेश गिड्डे, संतोष भोसले, बाळासाहेब तंगडी, साईसाब नदाफ व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : २८ संख १