राज्यघटनेबाबत राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:27+5:302021-04-15T04:25:27+5:30

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरावेळी आमदार अरुण लाड, शरद ...

Don't politicize the constitution | राज्यघटनेबाबत राजकारण करू नये

राज्यघटनेबाबत राजकारण करू नये

Next

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरावेळी आमदार अरुण लाड, शरद लाड, आदी उपस्थित होते.

पलूस : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही सामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिली गेली होती. या घटनेत केंद्र सरकारने आजवर अनेक वेळा मोडतोड केली. ही घटनेतील मोडतोड अराजकतेकडे नेणारी आहे. त्यासाठी जनतेचे राजकारण करू नये, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

कुंडल (ता. पलूस) येथील समाजमंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचारधारेतून आमची सामान्यांशी नाळ जोडली आहे. यामुळे सलग तीन वर्षे लोकशाहीचा अभ्यास करून तयार केलेल्या घटनेतील बदलांना आम्ही खपवून घेणार नाही.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, बोधिसत्त्व माने, अविनाश काळेबाग, हिंमत होवाळ, मनोज होवाळ, दिग्विजय सावंत, रोहित सावंत यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.

Web Title: Don't politicize the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.