आई-वडिलांचा सांभाळ नकोय, मग मालमत्ता विसरा, सांगलीच्या नरवाड ग्रामसभेत ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:58 AM2024-01-29T07:58:06+5:302024-01-29T07:58:34+5:30

Sangli: नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. 

Don't take care of parents, then forget about property, resolution passed in Sangli's Narwad Gram Sabha | आई-वडिलांचा सांभाळ नकोय, मग मालमत्ता विसरा, सांगलीच्या नरवाड ग्रामसभेत ठराव मंजूर

आई-वडिलांचा सांभाळ नकोय, मग मालमत्ता विसरा, सांगलीच्या नरवाड ग्रामसभेत ठराव मंजूर

- दिलीप कुंभार  
नरवाड (जि. सांगली)  - नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. 

ग्रामपंचायतीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सरपंच मारुती जमादार यांनी हा विषय ग्रामसभेत मांडला होता. याला ग्रामसभेने मंजुरी दिली. असा निर्णय घेणारी नरवाड ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. नव्या पिढीकडून आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यांना स्वत:च्याच घरातून बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला.

स्वत:चे सर्वस्व अर्पण करून आशेवर जे जीवन जगत आलेत त्या थकलेल्या हातांना मायेचा आधार मिळवून देण्यासाठी मी हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
- मारुती जमादार, सरपंच, 
नरवाड, ता. मिरज

Read in English

Web Title: Don't take care of parents, then forget about property, resolution passed in Sangli's Narwad Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.