डॉ. खिद्रापुरेचे कर्नाटक कनेक्शन उघड

By admin | Published: March 8, 2017 08:46 PM2017-03-08T20:46:37+5:302017-03-08T20:46:37+5:30

म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन

Dr. Opening of Karnataka connection to Khidrapur | डॉ. खिद्रापुरेचे कर्नाटक कनेक्शन उघड

डॉ. खिद्रापुरेचे कर्नाटक कनेक्शन उघड

Next

 ऑनलाइन लोकमत
सांगली/मिरज, दि. 8 - म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना यश आले. खिद्रापूरेसाठी महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करणाºया विजापूर व कागवाड येथील दोन डॉक्टरांसह पाच जणांना बुधवारी अटक करण्यात आली. यात खिद्रापूरेच्या रुग्णालयात काम करणाºया परिचर व परिचारिकासह गर्भपातासाठी औषध पुरविणाºयाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सोनोग्राफी यंत्र जप्त करण्यात आली आहेत.
अटक केलेल्यामध्ये डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकड (वय ६४, रा. विजापूर), डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (वय ६८, रा कागवाड, ता. अथणी), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक सौ. कांचन कुंतिनाथ रोजे (३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) व गर्भपातासाठी औषधाचा पुरवठा करणाऱ्या सुनील काशीनाथ खेडकर (वय ३५, रा. माधवनगर, सांगली) याचा समावेश आहे. यापैकी घोडके, रोजे व साळुंखे या तिघांना बुधवारी न्यायालयसमोर हजर केले असता १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

Web Title: Dr. Opening of Karnataka connection to Khidrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.