गर्भातच 19 हत्या करणा-या डॉ. खिद्रापुरेला अटक

By admin | Published: March 7, 2017 07:52 AM2017-03-07T07:52:18+5:302017-03-07T08:06:28+5:30

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मंगळवारी रात्री उशिरा बेळगाव येथून अटक करण्यात आली.

Dr., who was murdered 19 in the womb, Arrested in Khidrapurra | गर्भातच 19 हत्या करणा-या डॉ. खिद्रापुरेला अटक

गर्भातच 19 हत्या करणा-या डॉ. खिद्रापुरेला अटक

Next

 ऑनलाइन लोकमत 

सांगली, दि. 7 - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मंगळवारी रात्री उशिरा बेळगाव येथून अटक करण्यात आली. सांगली पोलिसांची पाच तपास पथक संपूर्ण राज्यात खिद्रापुरेचा शोध घेत होती. अखेर त्याला बेळगावमधून अटक करण्यात आली. 
 
मणेराजुरी (ता. मिरज) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेच्या मृत्यूनंतर रविवारी सांगली पोलिसांनी या अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला. बीएचएमएसची पदवी असलेल्या खिद्रापुरेने म्हैसाळमध्ये रुग्णालय सुरू केले होते. पण प्रत्यक्षात तो येथे अवैध गर्भपात करायचा. 
 
म्हैसाळच्या ओढ्यालगत गर्भपात करून दफन केलेले १९ भ्रूण पोलिसांना रविवारी सापडले. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या अटकेनंतर यापेक्षा आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केला होता. त्यावेळी स्वातीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचा पती व डॉ. खिद्रापुरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना पोलिसांना, खिद्रापुरे याचा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा हा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. 
 
आणखी वाचा 
‘गर्भपात’ केंद्रांना शासकीय यंत्रणेचे अभय!
आठ वर्षे गर्भपाताचा धंदा
 
शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन पोलिसांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकला असता, या छाप्यात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. तसेच तो बेकायदा गर्भपात करीत असल्याची बाहेरून गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे रविवारी सकाळपासून म्हैसाळच्या ओढ्यालगत जेसीबीच्या मदतीने खुदाई सुरु ठेवण्यात आली. सायंकाळपर्यंत तेथे दफन केलेले १९ भ्रूण सापडले. 
 
मणेराजुरीतील विवाहितेचा मृत्यू गर्भपात करतानाच झाल्याचे शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणीत स्पष्ट झाले होते. याचा तपास व पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकला. या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रसामग्री आढळून आली. गर्भपात करण्यापूर्वी महिलांना भूल दिली होती. यासाठी भूलतज्ज्ञांना बोलावून त्यांना दिलेल्या ‘फी’चे रजिस्टरही सापडले. गर्भपात करण्यासाठी लागणारे साहित्यही सापडले. 
 
जिल्ह्णासह अन्य गावांतून कुटुंबनियोजन तसेच गर्भपात करण्यासाठी येथे महिला आल्या होत्या. त्यांच्या नावांचेही रजिस्टर आढळून आले. खिद्रापुरे याने बीएचएमएस पदवी घेतली आहे. तसे प्रमाणपत्रही सापडले आहे. तो स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही त्याने महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पंचनाम्यावेळी आढळून आल्यानंतर या ‘रॅकेट’चा पर्दाफाश झाला.

Web Title: Dr., who was murdered 19 in the womb, Arrested in Khidrapurra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.