नागोळेत ड्रॅगन फूडमुळे लाखोंची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:20+5:302021-07-16T04:19:20+5:30

फोटो ओळ : नागोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे भाऊसाहेब नरळे यांनी ड्रॅगन फूडच्या उत्पन्नातून लाखोंची कमाई केली आहे. फोटो ओळ-- ...

Dragon food in Nagole earns millions | नागोळेत ड्रॅगन फूडमुळे लाखोंची कमाई

नागोळेत ड्रॅगन फूडमुळे लाखोंची कमाई

Next

फोटो ओळ : नागोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे भाऊसाहेब नरळे यांनी ड्रॅगन फूडच्या उत्पन्नातून लाखोंची कमाई केली आहे.

फोटो ओळ-- नागोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे भाऊसाहेब नरळे यांनी ड्रॅगन फूडच्या उत्पन्नातून लाखोंची कमाई केली आहे.

महेश देसाई

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळे येथे शेतकरी आता ड्रॅगन फूड फळाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. येथील भाऊसाहेब राजाराम नरळे यांनी अडीच एकरांतून गत तीन वर्षांत सुमारे १५ लाख उत्पन्न घेतले आहे. त्यांनी १५ जून २०१९ मध्ये या पिकाची लावणी केली होती.

लावणीनंतर केवळ शेणखत वगळता कोणतेही खत वापरले नाही. तसेच अन्य औषधांचाही खर्च नाही. पिकाला पंधरा दिवसांतून दोन ते तीन तास ठिबकद्वारे पाणी दिले. लावणीनंतर वर्षभराने उत्पन्न सुरू होते. एका वर्षात अडीच एकरांतून सुमारे ५०० टन इतके उत्पन्न मिळाले. त्यासाठी १०० रुपये प्रति किलो इतका दर मिळला. यातून पहिल्या तीन वर्षांत सुमारे पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळले. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फळ खाल्याने शरीरात पेशी वाढण्यास मदत होते. पंचवीस वर्षे हे पीक उत्पन्न देते.

कोट -

दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे पीक उत्तम आहे. कमी खर्चात जास्त आर्थिक उत्पन्न देणारे हे पीक आहे, इतर शेतकऱ्यांनीदेखील ड्रॅगन फूडचे उत्पादन घ्यावे.

- भाऊसाहेब नरळे, शेतकरी.

Web Title: Dragon food in Nagole earns millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.