ड्रेनेजचे खड्डे बुजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:13+5:302021-03-09T04:30:13+5:30

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अध्यक्षांचा सत्कार सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब जिल्हा परिषद ...

Drainage pits filled | ड्रेनेजचे खड्डे बुजविले

ड्रेनेजचे खड्डे बुजविले

googlenewsNext

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अध्यक्षांचा सत्कार

सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी, जिल्हा सचिव बाबासाहेब माने, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे, कार्याध्यक्ष अरुण मोरे, सचिव रमेश सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी जोशी, सदस्य मोहन सल्लावार उपस्थित होते.

उन्हाची तीव्रता वाढली

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विहिरी आणि कूपनलिका तळ गाठू लागल्या आहेत. अनेक पाझर तलावांमध्येही ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. यामुळे टेंभू, ताकारी सिंचन योजना सुरु करण्याची मागणी होत आहे.

शेरीनाला जलपर्णींनी भरला

सांगली : सांगली ते इस्लामपूर बायपास रस्त्यालगत असलेला शेरीनाला सध्या जलपर्णींनी भरला आहे. या जलपर्णींमुळे दूषित पाणी पुढे सरकत नाही. घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने जलपर्णी काढावेत, अशी मागणी नागरिकांची आहे.

Web Title: Drainage pits filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.