ड्रेनेज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:43+5:302021-06-19T04:18:43+5:30

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ ही १००० गुणांची स्पर्धा आहे. यामध्ये ड्रेनेज मेनहोल, सेप्टिक टँक सफाई ...

Drainage staff will be provided with state-of-the-art equipment | ड्रेनेज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने देणार

ड्रेनेज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने देणार

Next

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ ही १००० गुणांची स्पर्धा आहे. यामध्ये ड्रेनेज मेनहोल, सेप्टिक टँक सफाई मशीनद्वारे करणे, सेप्टिक टँकसाठी विशेष जनजागृती करणे, ड्रेनेज लाईन, सेप्टिक टँकबाबतच्या तक्रारी करण्यासाठी टोल फ्री नंबर देणे, सोशल मीडियाद्वारे जनजागृती अशा बाबींचा समावेश आहे.

महापालिकेत आयुक्त कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, सहा. आयुक्त दत्तात्रय गायकवाड, दिलीप घोरपडे, एस. ए. खरात, अशोक कुंभार, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते आदी उपस्थित होते.

यामध्ये ड्रेनेज, सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यावत सुरक्षासाधने, उपकरणे देणे तसेच स्वच्छतेसाठी आवश्‍यक मशिनरी, वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दरपत्रक मागवण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले.

महापालिकेने गतवर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात ३६ वा, तर राज्यात ९ वा क्रमांक मिळवला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेतही राज्यात ९ वा क्रमांक मिळवला आहे.

Web Title: Drainage staff will be provided with state-of-the-art equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.