सांगलीतील काकानगरला गटारीचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:17+5:302021-07-18T04:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगलीतील काकानगर परिसरात गटारीचे काम रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगलीतील काकानगर परिसरात गटारीचे काम रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमृत सावंत यांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
काकानगर परिसरात गटारीचे काम रखडले आहे. ते अर्ध्यावर थांबले असून तेथे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर दलदल निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तेथील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. रस्त्यामुळे कचरा संकलनाची गाडी आत येऊ शकत नाही. अपुऱ्या कामाबाबत ठेकेदाराकडे तक्रार केली असता जेवढा निधी मंजूर झाला, तेवढेच काम होणार. बाकी निधी आल्यावर बघू, अशी उत्तरे मिळतात.
घंटागाडी येत नसेल तर महापालिका कर का भरून घेते. याकडे तेथील नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अमृत सावंत यांनी मांडले आहे. याप्रकरणी महापालिकेवर मोर्चाचा इशारा देण्यात आला.