आयुक्त पदाचे स्वप्न अखेर पूर्ण -: नितीन कापडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:05 PM2019-06-19T23:05:07+5:302019-06-19T23:05:45+5:30

सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना,

 The dream of the post of the Commissioner finally completes: - Nitin Kapadnis | आयुक्त पदाचे स्वप्न अखेर पूर्ण -: नितीन कापडणीस

महापालिका आयुक्त पदाचा पदभार नितीन कापडणीस यांनी बुधवारी स्वीकारला. यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नकुल जकाते, दिलीप घोरपडे, वैभव वाघमारे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा पदभार स्वीकारला

सांगली : सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना, जनतेला मूलभूत सुविधा देण्याचा व शासकीय योजना मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

कापडणीस यांची महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. कापडणीस म्हणाले की, प्रशासकीय सेवेची सुरूवातच सांगली महापालिकेतून झाली होती. त्याच महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी सारेच परिचित असल्याने, पहिल्या सेकंदापासून कामाला सुरूवात करण्यात कसलीच अडचण नाही. जनतेला मूलभूत सुविधा देण्यास माझे प्राधान्य राहील. त्याशिवाय शासकीय योजना पूर्ण करण्यावर भर राहील. शासनाच्या योजना अपूर्ण राहिल्या, तर पुढील निधी मिळण्यात अडचण येते. त्यामुळे योजनांवरील निधी वेळेवर खर्च करून जादा निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू.

तीनही शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नाची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते मोकळे राहिले पाहिजेत. त्यासाठी नियोजन करू. फेरीवाला धोरणही रखडले आहे. त्याचीही अंमलबजावणी करणार आहोत. अनधिकृत बांधकामांना चाप लावला जाईल. त्यासाठी बांधकाम नियमावली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तीन शहरांची मिळून महापालिका झाली आहे. त्यामुळे आयुक्त म्हणून केवळ सांगलीच्या कार्यालयातच कामकाज करणार नाही, तर मिरज व कुपवाड शहरालाही आठवड्यातून एक दिवस राखीव ठेवणार आहोत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील समस्याही सुटण्यास मदत होईल. हे शहर चांगले करण्याचा प्रयत्न आहे. ज्या शहराने प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकविली, तिथे चांगले काम करू, असेही कापडणीस म्हणाले.

उत्पन्नाचे स्रोत : वाढविण्यावर भर
कापडणीस म्हणाले, जनतेला मूलभूत सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम हवी. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर आपला भर राहील. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करणार आहोत. त्यात अधिकारी, कर्मचारी निश्चितच सहकार्य करतील. त्यांना सोबत घेऊन जनतेला अपेक्षित असलेले कामकाज करता येऊ शकते. त्यामुळे प्राधान्याने आम्ही स्रोत बळकटीकरणावर भर देणार आहोत. .

 

Web Title:  The dream of the post of the Commissioner finally completes: - Nitin Kapadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.