कडेगावमधील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:51+5:302021-07-22T04:17:51+5:30

कडेगाव : कडेगावमधील दत्त नगर परिसरासाठी लवकरच नगर पंचायतीच्या नळपाणी योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल तसेच इतर सर्व ...

The drinking water problem in Kadegaon will be solved | कडेगावमधील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविणार

कडेगावमधील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविणार

Next

कडेगाव : कडेगावमधील दत्त नगर परिसरासाठी लवकरच नगर पंचायतीच्या नळपाणी योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल तसेच इतर सर्व पायाभूत सुविधाही देऊ, अशी ग्वाही नगराध्यक्ष संगीता राऊत यांनी दिली.

कडेगाव येथील दत्त नगर वसाहतीच्या नामफलकाचे अनावरण नगराध्यक्ष संगीता राऊत व उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी राऊत बोलत होत्या. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, राजेंद्र राऊत उपस्थित होते.

राऊत म्हणाल्या, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नगर पंचायतीला विविध विकासकामांसाठी २ कोटी १५ लाखांचा निधी दिला आहे. या निधीतून विविध प्रभागांत विकासकामे केली जाणार आहेत. अजूनही शहरात भरीव विकासकामे करण्यासाठी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल. दत्त नगर येथे हायमास्ट लॅम्प बसवला जाईल तसेच येथील पथदिव्यांचा प्रश्नही लवकरच निकालात काढला जाईल.

यावेळी तानाजी रास्कर, तानाजी भोसले, सदाशिव धर्मे, माजी सरपंच रुपाली यादव, मोहन जाधव, आप्पासाहेब यादव, गणेश जाधव, सुभाष येवले, कमलाकर घुगे, संतोष लोखंडे यांच्यासह दत्त नगर परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.

......................

फोटो : २१ कडेगाव १

ओळी : कडेगाव येथे दत्त नगर वसाहतीच्या नामफलकाचे अनावरण नगराध्यक्ष संगीता राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, डी. एस. देशमुख उपस्थित हाेते.

Web Title: The drinking water problem in Kadegaon will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.