सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:21 PM2022-07-15T19:21:19+5:302022-07-15T19:21:51+5:30

ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे.

Drinking water shortage in Sangli for a week | सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

सांगलीत ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

googlenewsNext

सांगली : शहरातील प्रभाग पंधरा मधील रमामातानगर, गारपीर चौक, पटेल गल्लीसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नगरसेवकांना स्वखर्चातून प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे. सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.

गेल्या दीड-दोन वर्षात शहरात अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतो. याबाबत अनेक वेळा आयुक्तांपासून अधिकाऱ्यांच्या पर्यंत सखोल बैठका झाल्या मात्र पाणी प्रश्न जैसे थे आहे. आता ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रमामातानगर, पटेल गल्लीसह बहुतांशी भागात गेल्या सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज राहतो. बकरी ईदच्या दिवशीही या परिसरात नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांनी स्वखर्चातून प्रभागात पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गढूळ पाण्याचा पुरवठा

शहरात अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात आता गढूळ, गाळ मिश्रित पाणीपुरवठा होत आहे. शुद्ध पाणीपुरवठ्याचा विसरच महापालिकेला पडला असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Drinking water shortage in Sangli for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.