रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 04:58 PM2021-12-20T16:58:37+5:302021-12-20T16:59:31+5:30

या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत.

The driver of 108 ambulance threatened the medical officer at Jat rural hospital sangli | रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

Next

जत : कामाच्या वादातून जत ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेवरील चालकाने वैद्यकीय अधिकाऱ्यास शिविगाळ करत दमदाटी करुन धमकी दिली. याप्रकरणी या संबंधित चालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगशे मोटे असे त्याचे नाव असून तो राजकीय कार्यकर्ता आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी वाघमोडे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच डॉ. वाघमोडे यांनी जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपला राजीनामाही दिला आहे. या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत.

डॉ. वाघमोडे यांनी निवेदना म्हंटले आहे की, १९ डिसेंबर रोजी जत ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असताना योगेश मोटे तेथे येऊन शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. असे प्रकार वारंवार घडतात. आरोग्य सेवा देताना जीव मुठीत घेऊन काम करणे शक्य नाही. यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत १०८ रुग्णवाहिका सेवेचे कोल्हापूर विभाग संचालक डॉ. अरुण मोराळे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

Web Title: The driver of 108 ambulance threatened the medical officer at Jat rural hospital sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.