Sangli: 'आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांना पाडा'
By शीतल पाटील | Published: October 11, 2023 07:07 PM2023-10-11T19:07:53+5:302023-10-11T19:09:16+5:30
मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या
सांगली : विद्यमान खासदार, आमदारांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यांना निवडणुकीत पाडा असे आवाहन मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केले. मराठा स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी ते बोलत होते.
साळुंखे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणाविना नुकसान होत आहे. या समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. आरक्षणासाठी आता प्रत्येक समाजबांधवाने लढायचे आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आमदार, खासदारांना मराठा समाजाची फसवणूक केली आहे. समाजाने त्यांना निवडणुकीत जागा दाखवून द्यावी, असेही ते म्हणाले.
प्रारंभी मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रभाकर उर्फ अण्णा शंकरराव कुरळपकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकारी निवडी याप्रमाणे - सांगली शहर उपाध्यक्ष : सुनील दळवी, सावळी गाव प्रमुख : गणेश साळुंखे, मिरज शहराध्यक्ष : संतोष दाणेकर, माधवनगर प्रमुख : आकाश माने, कुपवाड शहर प्रमुख : प्रशांत पवार, सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण. नूतन पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ता संतोष पाटील उपस्थित होते.