२० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:47 AM2018-05-19T05:47:07+5:302018-05-19T05:47:07+5:30

जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत.

Drought-free from 20 thousand villages till 2019 | २० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

२० हजार गावे २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करणार

Next

जत (जि. सांगली) : जलसंधारणाच्या कामांमुळे राज्यातील ११ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी आणखी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. २०१९ अखेर राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.
जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा परिसरात पानी फौंडेशन आणि लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून फडणवीस यांनी श्रमदान केले.
फडणवीस म्हणाले की, एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली. तिला आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून, जिरवला जात आहे. पानी फौंडेशनच्या कामासाठी शासन डिझेल कमी पडू देणार नाही. संपूर्ण गावातील नागरिक मैदानात येऊन काम करत आहेत. पक्ष, गट-तट व मतभेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र काम करत आहेत. त्यामुळे गावातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात
येईल.
>मुख्यमंत्र्यांचे श्रमदान
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावकºयांसमवेत स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. त्यांनी
यावेळी गावकºयांशी संवाद साधला व पानी फौंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली. भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतिलाल मुथा यांच्यासह आमदारांनी त्यांना मदतीचा हात दिला.

Web Title: Drought-free from 20 thousand villages till 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.