दुष्काळमुक्तीला बंधारे ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:19 AM2021-07-11T04:19:11+5:302021-07-11T04:19:11+5:30

जत : जत तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने येथे पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. यासाठी जलसंधारणाला अधिक ...

Drought relief will be a boon | दुष्काळमुक्तीला बंधारे ठरणार वरदान

दुष्काळमुक्तीला बंधारे ठरणार वरदान

Next

जत : जत तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने येथे पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. यासाठी जलसंधारणाला अधिक महत्त्व द्यावे लागेल. तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जत पूर्व भागात होत असलेल्या नऊ बंधाऱ्यांमुळे दुष्काळमुक्तीला साथ मिळणार आहे, असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी केले.

जत तालुक्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत मंजूर झालेल्या नऊ बंधाऱ्यांचे उद्घाटन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मुचंडी, सिध्दनाथ, पांढरेवाडी, संख आदी ठिकाणी कार्यक्रम पार पडला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, सुजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, मारुती पवार, सरपंच अशोक पाटील, प्रकाश पांढरे, एम. आर. जिगजेणी, साहेबगौड़ा पाटील, जालिंदर व्हनमाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी विनायक खरात, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जगदीश मेटकरी, शाखा अभियंता जलसंधारण विभाग शरद सुतार उपस्थित होते.

आमदार सावंत म्हणाले, आज म्हैसाळ योजनेला दोन वर्षात मोठ्या प्रमाणात गती दिली. त्यामुळे इकडे उमदीपर्यंत पाणी आले आहे. आवंढी तसेच देवनाळ भागातही पाणी पोहोचले आहे. येणाऱ्या आवर्तनापर्यंत म्हैसाळ योजना शंभर टक्के कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनीही मोठे सहकार्य केले आहे.

चाैकट

शेतीला फायदा

मुचंडी येथे सहा तर सिद्धनाथ, संख, पांढरेवाडी येथे चेकडैम मंजूर केले आहेत. मुचंडी भागातील धरणामुळे ५१४.५७ सघमी पाणीसाठी उपलब्ध होणार असून, १८२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या कामावर ७१४.१० कोटी रुपये खर्ची होणार आहेत. तसेच संख नाटेकरवस्ती येथे ११५.५० कोटी पांढरेवाडी लेंगरेवस्ती येथे ११०.५९ कोटी रुपये, सिद्धनाथ बिदरीवस्ती येथे ९७.९५ लाख रुपये खर्च करून हे बंधारे होत आहेत. असे एकूण १०३८.१४ कोटी निधी दुष्काळमुक्तीसाठी या बंधाऱ्यांचा फायदा होणार आहे. असे आमदार सावंत यांनी सांगितले.

100721\img-20210710-wa0034.jpg

दुष्काळमुक्तीला चेकडॅम ठरणार वरदान : आ.विक्रम सावंत

Web Title: Drought relief will be a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.