दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:20+5:302021-07-02T04:18:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या मद्यपीवर वाहतूक शाखेसह विविध पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या मद्यपीवर वाहतूक शाखेसह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा बडगा उगारला जातो. पण कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ही कारवाई थंडावली आहे. मद्यपीवर कारवाई करताना पोलिस कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क होतो. परिणामी कोरोनाचा संसर्ग पोलिसांनाही होण्याचा धोका वाढल्याने कारवाईत खंड पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
दारूच्या अंमलखाली वाहन चालविणे हा गुन्हा आहे. याची पुरती कल्पना असतानाही अनेकजण मद्यपान करून वाहन चालवित असतात. वाहतूक पोलिसांकडून मद्यपीवर कारवाईचा बडगा उगारला जातो. २०१९ मध्ये ७०४ तळीरामांवर कारवाई झाली होती तर २०२० मध्ये १०९ जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोनामुळे कारवाईत मोठा खंड पडला आहे. पहिल्यांदा सापडल्यास दंड होतो. अथवा न्यायालयाकडून त्याचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित केला जातो.
चौकट
ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद
तळीरामांची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडून ब्रिथ ॲनालायझरचा वापर होते. पण या यंत्राचा वापर करताना थेट वाहनचालकांशी संपर्क येतो. त्यातून कोणी पाॅझिटिव्ह असेल तर पोलिसांनाही त्याचा धोका आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच ब्रिथ ॲनालायझरचा वापर तूर्तास बंद करण्यात आला आहे.
चौकट
कोट
कोरोना संसर्गाचा धोका पाहता सध्या ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. त्यातून कोणी मद्यप्राशन करून वाहनच चालविताना सापडला तर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन चाचणी करण्यात येते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करतो. सध्या कोरोना, लाॅकडाऊनमुळे कारवाईत बाधा आली आहे. त्यातूनही संसर्गाबाबत दक्षता घेऊन मद्यपीवर कारवाई सुरूच आहे.
- प्रज्ञा देशमुख, सहा.निरीक्षक वाहतूक शाखा, सांगली
चौकट
महिना २०१९ २०२०
जानेवारी : १०८ ५३
फेब्रुवारी : ८५ ६६
मार्च : १२१ ६३
एप्रिल : ६१ --
मे : ८४ --
जून : ९२ --
जुलै : ३३ --
ऑगस्ट : ०९ --
सप्टेंबर : १२ --
ऑक्टोबर : ०९ --
नोव्हेंबर : ३४ --
डिसेंबर : ५६ ०८
चौकट
२०२१
जानेवारी : ०७
फेब्रुवारी : ०१
मार्च : --
एप्रिल : --
मे : --
जून : --