दारूच्या नशेत पत्नी, मुलाचा खून

By admin | Published: October 31, 2014 01:13 AM2014-10-31T01:13:42+5:302014-10-31T01:14:09+5:30

अंकलखोपमधील प्रकार : संशयित स्वत:हून भिलवडी पोलीस ठाण्यात हजर

Drunken wife, son's murder | दारूच्या नशेत पत्नी, मुलाचा खून

दारूच्या नशेत पत्नी, मुलाचा खून

Next


भिलवडी : अंकलखोप (ता. पलूस) येथील शंकर दिनकर पाटील (वय ४५) याने पत्नीचा धारदार कोयत्याने वार करून, तर मुलाचा शेजारच्या विहिरीत फेकून बुडवून मारून खून केला. सौ. शैला (४०) व सत्यजित (५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. पत्नी व मुलाचा खून केल्यानंतर शंकर पाटील स्वत: भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. आज, गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत भिलवडी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद असून, पोलिसांनी शंकर पाटील यास अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शंकर पाटील हा पत्नी, एक मुलगी, मुलगा व आईसह अंकलखोप येथील नागठाणे फाट्यालगत शेतामधील घरामध्ये रहात होता. तो नेहमी दारू पिऊन घरात वादावादी करीत असे. आज त्याची आई व नऊ वर्षाची मुलगी भिलवडी येथील नातेवाइकांकडे गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत शंकर घरी आला. त्याने पाच वर्षांचा मुलगा सत्यजित यास उचलून घराशेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये फेकून दिले. विहीर पाण्याने भरली असल्याने पाण्यात बुडून सत्यजितचा मृत्यू झाला. यानंतर शंकरने घरात येऊन पत्नी शैलाच्या गळ््यावर धारदार कोयत्याने वार करून तिचा खून केला. दारूची नशा उतरल्यानंतर तो भिलवडी पोलीसात आला. दारूच्या नशेमध्ये पत्नी आणि मुलाचा खून केला असून, मला अटक करा, असे त्याने सांगितले. त्याचे मेहुणे वैभव नामदेव पाटील (रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यांनी भिलवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
रात्री नऊ वाजता मुलाचा मृतदेह सापडला
शंकर पाटील याने मुलगा सत्यजितला घराशेजारच्या विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले. सायंकाळपासून अंकलखोप येथील नागरिक व भिलवडीतील मच्छिमारांनी मासे पकडण्याच्या जाळ्याच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध सुरू ठेवला. शेवटी रात्री नऊ वाजता जाळ्याच्या साहाय्याने सत्यजितचा मृतदेह शोधण्यात यश आले. रात्री उशिरा माय-लेकरांच्या मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Drunken wife, son's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.